दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनगाव (बंगला) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ’गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण’ या विषयावर श्री. दत्तात्रय ननवरे यांच्या गोठयावर प्रात्यक्षिक करून माहिती दिली.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रितल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकंन्यानी हा कार्यक्रम पार पाडला.