कास पठारावरील नोटीस बजावण्यात आलेल्या 124 अनधिकृत बांधकामांमध्ये अनेक बड्या धेंडांची गुंतवणूक आहे ही अतिक्रमणे तात्काळ पाडण्यात यावी अन्यथा या विषयावर आठ सप्टेंबर रोजी सातारा शहरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात गाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले कास पठार हे जागतिक वारसा स्थळ लाभलेले ठिकाण आहे येथील 124 अनधिकृत बांधकामे ही राजकीय व्यक्तींच्या अवतीभवती वावरणाऱ्या चेल्या चपाट्यांची आणि सोज्वळतेचा बुरखा पांगरलेल्या व्हाईट कॉलरवाल्यांची आहेत सर्वसामान्यांनी नियम तोडल्यास त्यांच्याकडून प्रशासन दंड वसूल करते मात्र कास पठार भकास करणाऱ्या धन दांडग्यांवर आज अखेर फक्त नोटीसा बजावण्यात महसूल विभागाने धन्यता मानलेली आहे . म्हणजे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि धनदांडग्यांना सवलत हे असंविधानिक असून घटनेच्या विरोधात आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने नोटीसा बजावलेल्या अतिक्रमणांना तात्काळ बांधकाम नियमावली तपासून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय गाडे यांनी केली.
या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व महारुद्र तिकुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे येत्या पंधरा दिवसात ही अतिक्रमणे न पाडल्यास येत्या 8 सप्टेंबर रोजी रिपाई चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत कांबळे व प्रभारी हेमंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बोंबाबोब आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय गाडे यांनी दिला आहे.