लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, राहुल गांधींसोबतच्या धक्काबुक्कीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया


 

स्थैर्य, दि.२: हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी यमुना एक्सप्रेसवरुन पायी जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. यादरम्यान, राहुल गांधींना धक्काबूक्की करण्यात आली आणि यात त्यांच्या हाताला मुका मार लागल्याची माहिती आहे. या प्रकरावार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटद्वारे संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले वर्तन निंदनीय आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!