दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | सातारा |
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत ‘यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है’, अशी घोषणा देत १६ ऑगस्ट १९४७ रोजी मोर्चा काढला होता. या घोषणेला स्मरून डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ‘चले जाओ’ आंदोलन केले.
याबाबत दिलेल्या निवेदनात डेमोक्रेटीक पार्टीने म्हटले आहे की, आजही देशात महिलांची नग्न धिंड काढली जाते. मागासलेल्या समाजाचे जगणे मुश्किल झाले आहे. महापुरूषांच्या नावाचा अपमान केला जात आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी घोषणेची आंदोलनाची आठवण येते. केंद्रातील व राज्यातील सत्ताधार्यांना सत्तेत बसण्याचा नैतिक अधिकार नाही.
बुधवारी राज्यभर ‘चले जाओ’चा नारा देत सरकारच्या निषेध करण्यात आला.