
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण |
भुरकरवाडी, सासवड, हिंगणगाव, टाकुबाईचीवाडी येथील शेतकर्यांनी धोम बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत हे पाणी आल्यामुळे समाधानकारक पिके घेतली जातात. गेल्या दोन वर्षात कमी पाऊस झाल्याने दुष्काळाशी सामना करावा लागला होता. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले होते. या भागात दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकर्यांची आर्थिक वाहिनी यावरच अवलंबून आहे. बर्याच गावातील पिण्याच्या पाण्याची विहिरी तलावाच्या काठावर आहेत. हे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
धोम बलकवडीचे फलटण येथील कार्यालयात मागणी अर्ज दाखल केले आहेत. आमदार सचिन पाटील व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माणिकराव सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती तरडगावचे माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.