फलटण शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण शहरातील गजानन चौकात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे.

फलटण शहरातील गजानन चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नवीन पुतळा एक वर्षापूर्वी नगरपालिकेने बसवला आहे. ३० जानेवारी २०२५ रोजी महात्मा गांधींची पुण्यतिथी असून यावेळी शहर व तालुका परिसरातील अनेक संस्था व नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात, पण सद्य:स्थितीत पुतळा व विशेषतः चबुतर्‍यावर डाग पडून खराब झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याचे व चबुतर्‍याची स्वच्छता करून व सुशोभीकरण करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. श्री. सचिनभैय्या सूर्यवंशी (बेडके) यांच्या सूचनेनुसार व तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण नगर परिषदेचे उपमुख्याअधिकारी तेजस पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. पंकज पवार तसेच खजिनदार श्री. बालमुकुंद भट्टड, कार्यकारणी सदस्य श्री. मंजेखान मेटकरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकरराव लोखंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे श्री. गंगाराम रणदिवे उपस्थित होते.

या निवेदनाची त्वरित दखल घेऊन श्री. तेजस पाटील यांनी तातडीने पुतळा व परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!