स्थैर्य, ढेबेवाडी, दि. 6 : कोरोनाच्या महा-मारीने जनता त्रस्त झाली आहे. लाखो लोकांचे रोजगार बंद आहेत. उद्योगधंदा नसल्याने जनता धडपडत आहे. अशातच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची महागाई करून दुसरे संकट लोकांवर लादले आहे. ते त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रांतिक प्रातिनिधिक हिंदुराव पाटील यांनी पाटणचे तहसीलदार समीर यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट समोर असताना हे दुसरे संकट पुढे उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत जगायचं कसं, असा प्रश्न लोकांसमोर आहे. तेव्हा केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घेवून लोकांना दिलासा द्यावा.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग, जिल्हा काँग्रेसचे सदस्य नरेश देसाई, श्रीनिवास पाटील, माजी अध्यक्ष आर. बी. पाटील, सरपंच अमोल पाटील, नरेंद्र पाटणकर उपस्थित होते.