स्थैर्य, सातारा, दि.१२: महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील, तरूणींवरील, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. या अनुषंगाने सातारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला सुरक्षिततेबाबत त्वरित एसओपी बनविण्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातहीकोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे.भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनांबद्दल निवेदन पाठविले. या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचे प्रशासनावर देखील अंकुश असल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकार्यांनानिवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. परंतु, तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. तरी महिला सुरक्षिततेबाबत त्वरित एसओपी बनवण्यात यावी, असेही म्हणले आहे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णा पाटील, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष सौ. रीना भणगे, महिला मोर्चा सातारा ग्रामीणचे अध्यक्ष सौ मोनाली पवार, सातारा नगरपालिका गटनेत्या व नगरसेविका सौ सिद्धीताई पवार, नगरसेविका सौ आशाताई पंडित, जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. सुनिशा शहा, सातारा शहर उपाध्यक्ष सौ. मनीषाताई पांडे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, सातारा शहर चिटणीस सौ. नजमा बागवान, युवती मोर्चा तालुका अध्यक्ष पल्लवी गायकवाड, सारिका मदने, कोमल अनपट, पुनम बाबर, शमीन शेख, पूनम पवार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, सतीश भोसले, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक धनंजय जांभळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा नंदकुमार यादव, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा ग्रामीण सरचिटणीस गणेश पालखे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष उत्कर्ष रेपाळ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, आरोग्यसेवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कदम, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, सातारा ग्रामीण उपाध्यक्ष नितीन कदम, जिजाबा कारंडे, विक्रम पवार, शहर चिटणीस रवी आपटे, नितीन जाधव, लखन चव्हाण, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, युवा तालुका अध्यक्ष सुजित साबळे, अनुसूचित जाती शहराध्यक्ष संदीप वायदंडे, ज्येष्ठ नागरीक शहराध्यक्ष प्रकाश शहाणे, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष कैलास मोहिते, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष लक्ष्मण पटेल, औद्योगिक आघाडी शहराध्यक्ष रोहित साने, कामगार आघाडी शहराध्यक्ष तानाजी बनगे, सातारा शहर युवा उपाध्यक्ष आकाश कारंजकर, माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, अमोल कांबळे, किशोर गालफाडे, विक्रम अवघडे, महेश साबळे, तेजस काकडे, कुलदीप सपकाळ, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.