निवासी जागांना असलेली मागणी आघाडीच्या आठही शहरांमध्ये वाढली : PropTiger अहवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । मुंबई । आर्थिक स्थैर्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक आत्मविश्वास आल्यामुळे निवासी जागांना असलेली मागणी आघाडीच्या आठही शहरांमध्ये वाढली आहे. घरांची विक्री व नवीन पुरवठा यांमध्ये एप्रिल-जून २०२० सकारात्मक वाढीची नोंद झाली.

रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल- एप्रिल-जून २०२२ या अहवालानुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी जागांच्या बाजारपेठांचे तिमाही विश्लेषण REA चे पाठबळ असलेल्या PropTiger.com द्वारे केले जाते. मालमत्तेच्या किमतींमध्ये अलीकडेच झालेल्या वाढींचा घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही असे कोरोनाविषाणू साथीनंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात झालेली सुधारणा यांवरून दिसून येते.

या अहवालात अभ्यासण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली- राजधानी परिसर व पुणे यांचा समावेश होतो.

Housing.com, PropTiger.com आणि Makaan.com यांचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वाधवान यांनी सांगितले की, “आरबीआयने पहिल्या तिमाहीदरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो ४.९० टक्क्यांवर आणला असला, तरीही विश्लेषण केलेल्या कालखंडादरम्यान गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. घरांच्या मागणीत होत असलेल्या वाढीमागील सर्वांत मोठा घटक म्हणजे स्वत:च्या मालकीची मालमत्ता असण्याला वाढीव महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्याला ग्राहकांचा एकूण आर्थिक परिस्थितीबाबतचा आत्मविश्वास व उत्पन्नातील स्थैर्य यांची जोड मिळाली आहे.”

अहमदाबाद, हैदराबादमधील विक्रीत सर्वोच्च वाढ:

या अहवालानुसार, ३० जून रोजी समाप्त तिमाहीदरम्यान घरांच्या विक्रीत मागील तिमाहीच्या (कॅलेंडर वर्ष २०२२ ची पहिली तिमाही) तुलनेत अनुक्रमिक ५ टक्के वाढ दिसून आली. या अहवालातील आकडेवारीनुसार, आघाडीच्या आठ बाजारपेठांमध्ये २०२२ सालातील दुसऱ्या तिमाहीत ७४,३३० घरे विकली गेली, पहिल्या तिमाहीत हा आकडा ७०,६२० घरे एवढा होता. सर्वाधिक अनुक्रमिक वाढ अखेरच्या ग्राहकाद्वारे प्रेरित अहमदाबाद व हैदराबाद या बाजारपेठांमध्ये सर्वोच्च म्हणजेच अनुक्रमे ३० टक्के व २१ टक्के एवढी दिसून आली.

विक्रीतिमाही
शहर २०२२ २०२१ तिमाहीगणिक वर्षागणिक
तिमाही२२०२२ तिमाही१२०२२ तिमाही२२०२१
अहमदाबाद ७,२४० ५,५५० १,२८० ३०% ४६५%
बेंगळुरू ८,३५० ७,६७० १,५९० ९% ४२५%
चेन्नई ३,२२० ३,३०० ७१० -२% ३५४%
दिल्लीएनसीआर ४,५२० ५,०१० २,८३० -१०% ६०%
हैदराबाद ७,९१० ६,५६० २,४३० २१% २२६%
कोलकाता ३,२२० २,८६० १,२५० १२% १५७%
मुंबई २६,१५० २३,३६० ३,३८० १२% ६७३%
पुणे १३,७२० १६,३१० २,५०० -१६% ४५०%
भारत ७४,३३० ७०,६२० १५,९७० ५% ३६५%

स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एप्रिल-जून २०२२, PropTiger रिसर्च

कोलकात्यामध्ये नवीन प्रकल्पांची संख्या दुप्पट:

नवीन पुरवठ्यातील आकडेवारीने विक्रीच्या आकडेवारीला ओलांडले आहे. यामध्ये तिमाहीगणिक २८ टक्के वाढ झाली आहे. भारतातील आघाडीच्या आठ निवासी जागा बाजारपेठांमध्ये दुसऱ्या तिमाहीत १,०२,१३० नवीन जागा विक्रीसाठी आल्या, पहिल्या तिमाहीत हा आकडा ७९,५३० होता. कोलकात्यामध्ये तिमाही तत्त्वावर नवीन पुरवठा दुपटीने वाढला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नवीनपुरवठातिमाही
शहर २०२२ २०२१ तिमाहीगणिक वर्षागणिक
तिमाही२२०२२ तिमाही१२०२२ तिमाही२२०२१
अहमदाबाद ९,५०० ५,०६० १,५४० ८८% ५१६%
बेंगळुरू १२,७३० ७,०७० ३,४३० ८०% २७२%
चेन्नई १,८३० १,६३० ४९० १२% २७४%
दिल्लीएनसीआर २,९७० ४,२७० ८२० -३१% २६२%
हैदराबाद १६,४८० १४,५७० ८,८१० १३% ८७%
कोलकाता २,०१० ९९० १,०१० १०३% ९८%
मुंबई ४३,२२० ३०,३६० २,९३० ४२% १३७७%
पुणे १३,३९० १५,५८० २,८१० -१४% ३७६%
भारत १,०२,१३० ७९,५३० २१,८४० २८% ३६८%

*एककांच्या संख्येचे रूपांतर निकटच्या हजारी संख्येत करण्यात आले आहे

स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एप्रिल-जून २०२२, PropTiger रिसर्च

शहरांतील मालमत्तेच्या मूल्यांतील वाढ:

त्याचवेळी आघाडीच्या शहरातील नवीन व उपलब्ध मालमत्तांच्या सरासरी मूल्यांमध्ये या कालखंडात ५ टक्के ते ९ टक्के दरवाढ झालेली आहे. कच्च्या मालाच्या किमतींमधील वाढ, वाढती महागाई व रेडी-टू-मुव्ह-इन इन्व्हेंटरीशी निगडित प्रीमियम यांमुळे ही वाढ झाली आहे. विश्लेषित कालखंडातील दरांमधील वाढ पुणे व चेन्नई शहरांमध्ये सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी ९ टक्के (मागील वर्षाच्या तुलनेत) होती.

जून२२मधीलप्रतिचौरसफूटकिंमतरुपयांमध्ये
शहर मार्च२२मधील प्रति चौरस फूट दर/रुपये मागील वर्षाच्या तुलनेतील वाढ %
अहमदाबाद ३,५००- ३,७०० ८%
बेंगळुरू ५,७००


Back to top button
Don`t copy text!