दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२२ । सातारा । सातारा शहरातून जाणाऱ्या कण्हेर उजव्या कॅनॉलची दुरुस्ती करावी किंवा नागरी वस्ती मध्ये पाईप लाईन टाकावी अशी मागणी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली . या कालव्याची अत्यंत दूरावस्था झाली असून पाणी गळती वाढल्याने ही मागणी करण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना निवेदन सादर केले . या निवेदनात नमूद आहे की कण्हेर कॅनॉलची दुरुस्ती आज पर्यंत झालेली नाही , दोन्ही बाजूंच्या परतीचे सिमेंट निघून गेले आहे , आणि त्यामुळे ,जवान्स कोऑप हौसिंग सोसायटी , जेसीओ को ऑप हौसिंग सोसायटी, ऑफिसर्स को ऑप हौसिंग सोसायटी, कांग कॉलनी , कूपर कॉलनी , मिलिंद सोसायटी, कोयना सोसायटी, जय विजय सोसायटी तसेच ग्रामीण भागातील चाहुर, खेड, कृष्णानगर, संगमनगर, वनवासवाडी, एम आय डी सी तसेच येथील जवळ जवळ २००० पेक्षा जास्त वसाहतीच्या परिसरात पाणी झिरपून घरांच्या पायांना धोका निर्माण झाला आहे . कॅनॉलचे पात्र काही ठिकाणी दीडपट मोठे असून काही घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे . कालव्याला बऱ्याच ठिकाणी गळती असून सिंचनाचा उद्देश्य पूर्ण होत नाही . त्यामुळे कण्हेर कालव्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्राधान्याने करण्यात आली आहे.
जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, मनोज कलापट,ऍड प्रशांत खामकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, , चिटणीस सुरेश निंबाळकर, विजय गाढवे ,सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे,जिल्हा विस्तारक स्वप्नील पाटील,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष रेपाळ, नगरसेवक विजय काटवटे, सिने कलाकार कामगार आघाडीचे शुभम फडतरे, दिपाली देशमाने, ओबीसी मोर्चाचे अविनाश खर्शिकर ,अनुसूचित जाति मोर्चाचे विक्रम अवघडे, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.