दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी हटवण्यासाठी शहराच्या प्रत्येक चौकातील अतिक्रमणे ही पन्नास मीटर मागे हटवण्यात यावीत त्याशिवाय ही वाहतूक कोंडी सुटणे शक्य नाही अशी सूचना वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. याशिवाय या बैठकीमध्ये वाहतुकीसह शहरातील दळणवळण सुलभ ही करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये वाहतूक सल्लागार समितीचे समन्वयक प्रकाश गवळी, सदस्य केदार नाईक ,संदीप भट्ट ,नीलकंठ पालेकर ,राजेंद्र रानडे, जयदीप ठुसे, राजेंद्र आपटे, राजेंद्र खंडेलवाल, महेश लोया, विकास बनकर, नरेंद्र पाटील, अविनाश कदम व व्यापारी वर्ग उपस्थित होते ही बैठक व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या दालनामध्ये झाली
सातारा शहरातील साधन सुविधा आणि त्यांचा विकास यांचा समन्वय साधण्याकरता मुळात समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत प्रकाश गवळी आणि नरेंद्र पाटील यांनी मांडले .वाहतूक सल्लागार समितीच्या बैठका प्रत्येक महिन्यात घेण्यात याव्या शहरातील प्रत्येक चौकातील रस्त्यावरील अतिक्रमणे 50 मीटर पर्यंत हटवली जावीत जेणेकरून वाहन चालकास ट्राफिक जाम ची समस्या होणार नाही, शहरातील व्यापारी लोकांच्यासाठी मासिक पास देऊन मंगळवार तळे परिसरातील मंडईच्या खालील पार्किंग जागा उपलब्ध करून देण्यात यावी ,गुरुवार परजावरील रिकाम्या जागेत बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, राजवाडा येथील जनावरांचा दवाखाना व प्रतापसिंह उद्यानाचा रिक्त भागात बहुमली पार्किंग उभारण्यात यावी, शहराच्या मुख्य चौकातील बंद सिग्नल सुरू करण्यात यावे ,500 पाटील जुना मोटर स्टँड चौकात नो एन्ट्री काढून प्रवेशास मंजुरी द्यावी, एसटी स्टँड तहसीलदार कार्यालय या रस्त्यावरील अतिक्रमणे फुटपाथ मोकळे करण्यात यावेत आणि दुकानदारांचे फलक ही हटवले जावेत पार्किंग झोनची निर्मिती करण्यात यावी, अनेक भाजीवाले फळ विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग झोन अडवून बसतात त्यांची योग्य ती व्यवस्था करावी, जिल्हा परिषद व राधिका रोड या ठिकाणी हॉकर साठी आरक्षित जागा देण्यात यावी, देवी चौक ते राजवाडा रस्त्यावरील फुटपाथची रुंदी कमी करून रस्ता मोठा केला जावा, पार्किंगला जागा उपलब्धता तिचा अडथळा कमी होणार आहे ,ट्रॅफिक पोलीस यांची वर्दळीच्या चौकामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी नेमणूक करण्यात यावी सातारा मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात वाहतूक नियमानापेक्षा विनापरवाना वाहनांवर कारवाई करण्याचे जास्त काम होते त्याला प्रतिबंध करण्यात यावा, ट्राफिक पोलिसांची संख्या पाहता कोठेही वाहतुकीचे नियंत्रण करताना दिसत नाही उलट कराड रस्त्यावर पुणे रस्त्यावर शहराच्या हद्दीवर वाहने अडवण्याचे काम होऊन गैरप्रकार केले जातात .गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक मीटिंगमध्ये एसटी बसेस ना पर्यायी मार्ग काढून देण्यात यावा जेणेकरून पोवई नाका ते हुतात्मा स्मारक रस्त्यावरील वाहतूक कमी होईल तसेच मध्यवर्ती बस स्थानकाच्या पूर्व दिशेला पारंगे चौकाकडे जाणारे आउट गेट बनवण्यात यावे इत्यादी पंधरा विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली
या सर्व चर्चेचा मसुदा तयार करून त्याचे निवेदन माननीय खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी नगरपालिकेची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सादर करण्यात येणार आहे या सर्व उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मंजूर करून त्याची अंमलबजावणी तात्काळ केली जावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे प्रकाश गवळी यांनी सांगितले