बारामती खरेदी विक्री सघांच्या समोरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 17 डिसेंबर 2023 | बारामती | विद्या प्रतिष्ठान समोरील बारामती एमआयडीसी हद्दीतील पेट्रोल पंपांच्या शेजारील व श्रीकृष्ण बेकरी ते मुक्ताई टेक्सटाईल समोरील अतिक्रमणे काढावीत; अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सूरज बाळासाहेब चौधर, अमोल गावडे, धनंजय आटोळे, संतोष पडळकर आदी विद्यार्थ्यांनी बारामती एमआयडीसी कार्यालयाकडे केली आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिक्षण अकॅडमी, क्लासेस आहेत. त्यांचा कोणताही त्रास विद्यार्थी किंवा नागरिकांना नसतो परंतु हॉटेल चालक, चायनीज विक्रेते, खाजगी फळे, भाजीपाला, चहा विक्रेते आदींनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी आणि नागरिक यांना येताना जाताना व वाहने चालविताना गर्दीतून वाट काढत व कसरत करीत चालावे लागते.

सकाळी क्लासेस, शाळा भरताना व सांयकाळी सुटताना मोठ्या प्रमानावर गर्दी होत असते. त्यामुळे अपघाताची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने लवकरात अतिक्रमण काढावे व वाहतुकीस रस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!