स्थैर्य, सातारा, दि. ०२ : साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरला अण्णाभाऊंचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची मागणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ही मागणी उमेश खंडूझोडे, अमर गायकवाड, अशोकबापू गायकवाड, संदीपभाऊ शिंदे, दिपकबापू पवार, दादासाहेब ओव्हाळ, उमेश चव्हाण, विजय काटवटे, भगवान अवघडे, देविदास कसबे, प्रकाश भिसे, सचिन पवार, किशोर गालफाडे, बंडू घाडगे, सचिन अवघडे, राजू आवळे, अमोल वायदंडे, शिवाजी भोसले, संपत भिसे, सतीश कांबळे, जगन्नाथ खवळे, प्रकाश फरांदे, अनिल भिसे, रघुनाथ बाबर, ऋषी गायकवाड, नीतीन रणदिवे, शेखर कांबळे, सागर बडेकर यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले की, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे पूर्वाश्रमीच्या सातारा जिह्यातील रहिवासी होते. त्यांनी आपल्या कथेत कधीही जातीयवाद मांडला नाही. आदर्श गावगाडय़ाचे चित्रण त्यांच्या कथेत दिसते. त्यांच्या कथातील नायिका ह्या धाडसी, जुलमी प्रस्थापित व्यवस्थेला झुगारून बंड करणाऱया होत्या. त्यांच्या समग्र साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, संघटनात्मक, वैचारिक, मनोरंजन या कार्याची दखल घेवून सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरला साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रेड सेपरेटर हे नाव देऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात गौरव व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील, विभागीय आयुक्त सो.(विधान भवन) पुणे विभाग, पुणे, मुख्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा, टी. अँड. टी. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आली आहे.