
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025 । फलटण । विंचुर्णी (पाटील वस्ती) येथे डी. पी. जळाल्याने याठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच याठिकाणी अंधाराचे मोठ्याप्रमाणात साम्राज्य आहे. याठिकाणी वीजपुरवठा नियमित करण्यासाठी महावितरणतर्फे नवीन ए.जी. डी. पी बसवावा अशी मागणी संताजी निंबाळकर यांनी फलटण तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले की, विंचुर्णी (पाटील वस्ती) येथील डी. पी. 27 फेब्रुवारी रोजी जळालेला आहे. याठिकाणी सध्या 150 नागरिक राहत आहेत. सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने येथे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी नवीन डी. पी. बसविण्यात यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.