स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. २ (रणजित लेंभे) : अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षक सभासद यांना मयत कर्ज निवारण निधी, सभासद कल्याण निधी, अपघाती मृत्यू व इतर प्रकारे शिक्षक बॅकेंकडून मदत दिली जाते. या दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करून ती अंशदान पेन्शन योजनेतील सभासदांना ५ लाख रुपयांवरून २० लाख रूपये करावी अशी मागणी शिक्षक समिती यांच्या मार्फत शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव, सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे व शिवाजी शिंदे यांनी केली आहे.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक राज्यातील शिक्षक बॅकांच्या तुलनेत प्रतीत यश प्राप्त केलेली बॅक आहे. बॅकेच्यावतीने सभासदांना मयत कर्ज निवारण निधी व सेवक कल्याण निधी व अपघात मदत व तातडीची मदत केली जाते. आता नव्यानेच सेवेतील सभासद कुटुंब कल्याण योजना सुरू केली आहे.त्यासाठी सभासदांच्या खात्यातून कायम ठेव व कल्याण ‘ निधी व सेवेतील सभासद कुटुंब कल्याण योजनेसाठी म्हणून ६००/- रूपयांची कपात केली जाते.ही बाब लक्षात घेता सभांसदांकडून कपात केलेल्या रक्कमेच्या तुलनेत सभासदांना मदत म्हणून मिळणारी रक्कम कमी असून त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने संचालक किरण यादव, सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे व शिवाजी शिंदे यांनी केली आहे.
नुकतीच शिक्षक समितीच्या संचालकांनी व्याजदर कमी करण्याबाबत दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक उपयोग होऊन ओव्हरड्राफ्ट कर्जाचा व्याजदर ही १ % नी कमी करण्यात शिक्षक समिती यशस्वी झाली आहे.
दरम्यान सभासदांच्या हितासाठी सभासदांच्या बॅक व्यवहाराबाबत असलेल्या इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सभासद हिताच्या शिक्षक समितीने सुचविलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव, सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे व शिवाजी शिंदे यांनी सांगितले.