
स्थैर्य, फलटण: महामारीच्या आजारावर मात करत असताना महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुली अथवा कर्जाचे हप्ते भरण्यास मनाई केलेली असतानाही फलटण तालुक्यात मात्र मायक्रो फायनान्स, बजाज फायनान्स आणि बचतगट फायनान्स यांच्याकडून बसुली केली जात आहे. या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काकडे यांनी केली आहे.
फलटण तालुक्यातील गरीब कष्टकरी व इतर मोलमजुरी करणार्या महिला व शेतीवर सालाने काम करत असेलेले कुटुब व त्याची लहान लहान मुले यांच्यावर या जागतीक महामारीच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच त्यांनी आपल्या गरजा पुरविण्यासाठी फायनान्स कंपन्याववाल्यांकडून खाजगी बचतगट मार्फत कर्ज काढलेले होते. पण महाराष्ट्र शासनाने या लॉकडाऊन मुळे अशा गरीब, मोलमजूरीने काम करणार्यांना सहकार्य म्हणून सहकारी, राष्ट्रीय बँका, पतसंस्था व मायको फायनान्स व इतर कर्ज देणार्या कंपन्या याना वसुली करणेचा आदेश जारी करूनसुध्दा या कंपन्या शासनाच्या आदेशाला धुळ चारत गोरगरीब मोलमजूर, शेतात सालाने काम करणारे मजूर, रिक्षाचालक, भाजी विकेते व इतर हातावरील पोट भरणारे लोकांच्या पाठीमागे वसुलीचा तगादा लावून व त्यांचे वसूली अधिकारी लोकांच्या घरातच स्थान मांडून वसूली केल्याशिवाय घरातून बाहेर निघत नाहीत.
तसेच बजाज फायनान्स याचे वसूली अधिकारी ग्राहकांना फोन करून तुमची कर्ज घेण्याची लायकी नसल्याने तूम्ही कर्जे घेतलीच कशी? अशापध्दतीचे धमकी वजा फोन येत आहेत. यामुळे सामान्य गोरगरीब, मोलमजूरी करणारे, शेतात सालाने काम करणारे, भाजी विक्रेते अत्यंत दहशतीखाली असून त्यांच्यापुढे लहान मुलाना कशा पध्दतीने जगवावे असा प्रश्न सतावत आहे व त्यामुळे भविष्यात कोरोना पेक्षा आत्महत्या केलेल्या लोकांचा मृत्यूदर वाढलेला शासनाला दिसू नये यासाठी अशा मायको फायनान्स व बजाज फायनान्स यांच्यावर शासनाने वेळीच दखल घेवून सदर बेकायदेशीर वसूली करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्यामुळे येणार्या गंभीर समस्येला आळा बसेल. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व वसुली अधिकार्यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.