
स्थैर्य, सातारा, दि. 27 डिसेंबर : ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्या साखर कारखान्यांवर तत्काळ कठोर कारवाई करून शेतकर्यांची थकीत ऊसबिले अदा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, अर्जुन साळुंखे, नितीन यादव, रवींद्र घाडगे, प्रमोद गाडे, बाळासाहेब शिपुकले, महादेव डोंगरे, सतीश साळुंखे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 17 साखर कारखाने चालू गळीत हंगामात ऊसगाळप करूनही मागील दोन महिन्यांपासून शेतकर्यांची बिले थकवली आहेत. काह कारखान्यांनी अद्याप ऊसदरही जाहीर केलेले नाहीत. त्यांचे हे कृत्य ऊस नियंत्रण कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. कायद्याला न जुमानता साखर कारखानदार आहेत. यापूर्वी या विषयावर अनेक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मग्रूर वागत निवेदन देण्यात आली असून, त्यावर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याची दखल घेत प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन करणार्या दाखल करत त्यांचे परवाने रद्द करण्याची सर्व साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
