
दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । मुंबई । डेल्टा ही पॉवर व थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनी जगभरातील ई-मोबिलिटी क्षेत्रामधील प्रमुख कंपनी म्हणून उदयास आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ईव्ही (इलेक्ट्रॉनिक वाहने) चार्जिंग सोल्यूशन्समधील प्रमुख अग्रणी म्हणून कंपनीने आशिया, यूएसए आणि युरोपसह जगातील विविध भागांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची स्थापना केली आहे. जगभरात ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी कंपनीने २०११ पासून जगभरातील ग्राहकांना १,०००,००० हून अधिक ईव्ही चार्जर्स शिपिंग केले आहेत. सध्या, डेल्टा युरोप, यूएसए व आशियातील जागतिक आघाडीच्या ईव्ही वाहन उत्पादकांना पॉवरट्रेन आणि ऊर्जा व्यवस्थापन यंत्रणा प्रदान करते.
उच्च-कार्यक्षमतेच्या ऊर्जा तंत्रज्ञानातील कौशल्यासह डेल्टा एक दशकाहून अधिक काळापासून जगभरात ऊर्जा-कार्यक्षम ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स वितरित करत आहे. २०२० मध्ये डेल्टाने योकोहामामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी जपानी ऊर्जा कंपनी इडेमित्सू कोसान कं. लि. सोबत सहयोग केला. डेल्टा आणि इडेमित्सू यांनी जुन्या गॅस स्टेशनचे ईव्ही चार्जिंग स्टेशनमध्ये नूतनीकरण केले, ज्यामध्ये कॅफे आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन ‘पार्क अॅण्ड चार्ज’ या थीम अंतर्गत कार्यरत आहे, जे स्मार्ट रिटेल एनर्जी इकोसिस्टम सक्षम करते, ज्यामध्ये डेल्टाचे एनर्जी स्टोरेज, पॉवर कंडिशनिंग सिस्टिम, ईव्ही चार्जर्स, डेल्टाग्रिड आयओटी ऊर्जा व्यवस्थापन यंत्रणा आणि डेल्टाचे रिटेल आयओटी सोल्यूशन यांचा समावेश आहे.
डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे अध्यक्ष व महा-व्यवस्थापक बेंजामिन लिन म्हणाले, ‘’आम्ही जगभरात ई-मोबिलिटी निर्माण करण्यात आघाडीवर आहोत. डेल्टा एक शाश्वत जग तयार करण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये हरित ऊर्जा पायाभूत सुविधा, स्मार्ट कारखाने आणि ई-मोबिलिटीचा समावेश आहे. आमचा जागतिक स्तरावर आमच्या ईव्ही चार्जर्सची डिलिव्हरी वाढवण्याचा उद्देश आहे. आम्ही आमच्या स्थानिक भागीदारांचे खूप आभारी आहोत, जेथे आम्ही ई-मोबिलिटी निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग केला आहे. भारतात आम्ही २०२३ च्या मध्यापर्यंत १०,००० हून अधिक ईव्ही चार्जर्स वितरित करण्याची अपेक्षा करत आहोत.’’