स्थैर्य, फलटण, दि. ०९: फलटण – सातारा रोड वरील तावडी फाटा नजिक रस्त्याच्या दुतर्फा असणार्या लिंब जातीच्या वृक्षांची तोड झाली असून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शासन वृक्षसंवर्धनासाठीचे वेगवेगळे उपक्रम राबवित असताना अशा प्रकारे वृक्ष तोड होणे गैर असून या प्रकाराबाबत संबंधित ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन वृक्षतोड करणार्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी, म्हणजे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, असे मत परिसरातून व्यक्त होत आहे.