स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २५ : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज एअरो इंडिया-21 च्या नियोजनाचा आढावा घेतला. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या संरक्षण विभागाने त्यांना अशी माहिती दिली, की हा कार्यक्रम सध्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या मार्गदर्शक तत्वानुरुपच होणार असून, या कार्यक्रमाचे नियोजन व्यवसाय केंद्रीत आहे. आकाशातील त्याची विलोभनीय दृश्ये पाहून मोहीत होणारी जनता यावर्षी हे प्रदर्शन दृकश्राव्य माध्यमातून पाहू शकेल, ज्यामुळे ए अँड डी व्यावसायिक भागीदारांसह नवीन वर्षात प्रत्यक्ष संवाद साधून नवीन भागीदारी वाढविण्यासाठी सहायक होईल.
या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला असून 500 पेक्षा अधिक प्रदर्शन व्यावसायिकांनी नोंदणी केल्याने सर्व स्टॉल्स विकल्या गेले आहेत. कोविड-19 ने निर्माण केलेल्या आव्हानांमुळे हे प्रदर्शन व्यावसायिक दिनी म्हणजेच 03 ते 05 फेब्रुवारी 2021 दरम्यान सुरू ठेवावे, असे निर्देश संरक्षणमंत्र्यांनी दिले, कारण अंतराळ आणि संरक्षण उद्योगाला 2020 या वर्षी आपले सर्व उपक्रम साध्य करण्यासाठी टाळेबंदी आणि प्रवासावरील प्रतिबंध/मनाई अशा विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले.
एअरो इंडिया -21 या प्रदर्शनाबाबत 2020 या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला वरिष्ठ परदेशी प्रतिनिधींना नवी दिल्ली येथे याबद्दल अवगत करण्यात आले होते, जेणेकरुन त्यांचे नेते तसेच निर्णय घेणारे वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थितीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यानंतर औपचारिक निमंत्रणेही पाठविण्यात आली. स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणूकीला 74% पर्यंत वाढविणे, संरक्षण अधिग्रहण कार्यपद्धती-2020 ची सुधारीत मार्गदर्शक तत्वे यानुसार एअरो इंडिया-21 द्वारे भारताची अंतराळ आणि संरक्षण उत्पादन क्षमता वाढत असल्याचे निदर्शनास येत असून भारतात सहविकास आणि सहउत्पादन या बाबतीत ही 2020 च्या या महामारीच्या कालावधीत संरक्षण उत्पादन आणि निर्यात प्रोत्साहन धोरण -2020 मधे (DPEPP) गुंतवणूक करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे.
अंतराळ आणि संरक्षण सामग्री तयार करण्याच्या क्षेत्रात भारताच्या जगात पहिल्या पाच देशांपैकी एक होण्याच्या निश्चयाचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आणि एअरो इंडिया-21 हे भारताच्या नेतृत्त्व करण्याच्या शक्यतांचे प्रतिक आहे. राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले की, आत्मनिर्भर भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीचा केंद्रबिंदू आहे. आणि भारतातील अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र परिपक्व झाले आहे आणि ते मित्रदेशांशी सतत दोघांनाही लाभदायक ठरेल अशा प्रकारच्या भागीदारी करत भारतासाठी तसेच जगासाठीही भारतात उत्पादित होणारी संरक्षण सामग्री बनविणाऱ्या उद्योगांची उभारणी करण्यासाठी संधीच्या शोधात आहे.
संरक्षणमंत्र्यांनी असे आवाहन केले की या कार्यक्रमासाठी केलेल्या प्रयत्नांचा समन्वय साधण्यासाठी भारतीय मोहिमांनी प्रभावीत व्हावे आणि इतर देशांचे नेते आणि वरिष्ठ स्तरावरील परदेशी उद्योगपतींनी एअरो इंडिया-21 या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भर द्यावा, जेणेकरून भारतात उपलब्ध असलेल्या सामरीक आणि व्यावसायिक संधींचा ते व्यापकतेने लाभ घेऊ शकतील. एअरो इंडिया-21 हा कार्यक्रम कोविड नंतरच्या जगात भारताच्या पुढाकार घेण्याचे आणि स्वतःचे सामर्थ्य आणखी वाढवेल, असा आत्मविश्वास संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.