दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । शिखर शिंगणापूर । मोही गावातील मोही विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 निवडणूक कार्यक्रम दि. 2 रोजी झाली. या निवडणुकीमध्ये बिल्वैश्वर विकास पॅनल व श्री महालक्ष्मी परिवर्तन विकास पॅनल अशी दुरंगी लढत झाली. या बिल्वैश्वर विकास पॅनलचे चिन्ह छत्री तर श्री महालक्ष्मी परिवर्तन विकास पॅनलचे चिन्ह टेबल होते. मोहीमधील राजकीय घडामोडी पाहता सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार अशी चित्र दिसत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजकीय रणनीतीने चुरशीची होणारी निवडणूक ही एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 13 च्या 13 जागेवर दणदणीत विजय मिळवला. एकूण मतदार संख्या 1062 पैकी 916 मतदान झाले. त्यातील ३९ मते बाद होऊन. पात्र मतदान 897 झाले. भारतीय जनता पार्टीच्या श्री महालक्ष्मी परिवर्तन विकास पॅनलचा 200 ते 300 च्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बिल्वैश्वर विकास पॅनल प्रमुख माजी सरपंच राजेंद्र देवकर व आनंदराव देवकर, आप्पासो देवकर यांनी केले. तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री महालक्ष्मी परिवर्तन विकास पॅनलचे पॅनल प्रमुख अर्जुन देवकर, देवराज कदम व साहेबराव भगत यांनी केले.
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालय अधिकारी पाटणे मॅडम यांनी काम पाहिले.
मोही विकास सेवा सोसायटी विजयी उमेदवार आप्पासो शंकर देवकर 588, रामचंद्र शिवाजी कुंभार 597, सतीश फडणीस देवकर 567, पोपट रामचंद्र कदम 551, श्रीमंत मधुकर पवार 546, तानाजी शंकर भगत 524, तानाजी दादा देवकर 501, दिलीप विष्णू देवकर 498, महादेव दगडू गायकवाड 578, वागदेव विलास मसुगडे 551, कृष्णांत बाजीराव देवकर 512, पुनम नंदकुमार जाधव 559, शशिकला आनंदा देवकर 546 हे उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रभाकर देशमुख व युवा नेते मनोज पोळ यांनी अभिनंदन केले.