
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटणच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, दिवाळीच्या मंगलमय पर्वावर ‘दिवाळी पहाट – गीत पुष्पांजली’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:१५ वाजता येथील मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात होणार आहे.
‘ऋतू इव्हेंट्स’ प्रस्तुत या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिद्ध गायिका वैदेही रामकृष्ण करंबेळेकर आणि त्यांचे सहकारी सुमधुर मराठी गीतांचा खजिना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण हे आहेत.
ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि नवनिर्मितीचा उत्सव असलेल्या दिवाळीची सुरुवात या संगीतमय कार्यक्रमाने करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन आयोजक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.