‘दीपारंभ २०२२’ दिवाळी विशेषांकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । ‘दीपारंभ” दिवाळी अंक-२०२२ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

शिवाली जाधव भदाणे आणि पल्लवी पवार संपादित दीपारंभ 2022 दिवाळी विशेषांक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दिवाळीअंक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दीपारंभ दिवाळी विशेषांक हा पर्यावरण विशेषांक असल्याने याचे महत्व अजून वाढले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पर्यावरण दिवाळी विशेषांकाबद्दल संपूर्ण दीपारंभच्या टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी दीपारंभचा दिवाळी विशेषांक काढण्यात येतो. या अंकामध्ये राज्यातील तसेच देशातील मान्यवरांचे लेख, कविता, रिपोर्ताज यांचा समावेश असतो. हा विशेषांक महाराष्ट्रभर वितरित होतो. तसेच दीपारंभला आतापर्यंत अनेक महत्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. यंदा दीपारंभ 2022 चा दिवाळी विशेषांक हा ‘पर्यावरण’ विशेष आहे. या अंकात दिग्गज लेखकांच्या, आणि कवींच्या लेखणीतून पर्यावरणाचे महत्त्व यात मांडले आहे.

दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनवेळी पत्रकार हर्षल भदाणे पाटील, तुषार पाटील, तुषार महाजन, योगेश्वर पाटील, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, अमर हाडोळतीकर, सुशील महाडिक यांच्या उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!