दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गत १५ वर्षे दीपक चव्हाण हे अतिशय उत्तम रित्या कामकाज करीत आहेत. तालुक्यातील अनेक महत्वाचे विषय त्यांनी त्यांच्या काळामध्ये मार्गी लावले आहेत.
त्यांच्या सारखा सुसंस्कृत आमदार तालुक्याला मिळाला आहे; हे तालुक्याचे भाग्य असून आता होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून दीपक चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तरी त्यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बघून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे; असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी केले आहे.
यावेळी बोलताना धैर्यशील उर्फ दत्ता अनपट म्हणाले कि; विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी भागाला पाणी मिळाले आहे.
हे आपण सर्वानी कधीही विसरता कामा नये. त्यामुळे त्यांच्यासोबत आपण सर्वानी ताकदीने उभे राहणे गरजेचे आहे.