आमदार दिपक चव्हाण यांचा विधिमंडळात सखोल अभ्यास : मिलिंद नेवसे; फलटणच्या विकासासाठी “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह लक्षात ठेवा!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२४ | फलटण | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली होती. विधानसभा तालिका अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाण यांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विधेयके मंजूर करण्यात आली. तर दीपक चव्हाण हे विधानसभेचे तालिका अध्यक्ष झाल्यानंतर विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली होती.

गत १५ वर्षे विधिमंडळाच्या कामकाजाचा सखोल अभ्यास हा आमदार दीपक चव्हाण यांचा झाल्याने फलटण मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणे गरजेचे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हवर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा; असे आवाहन क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.

विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आमदार दिपकराव चव्हाण यांनी अतिशय उत्कृष्ट असे कामकाज केले असून त्यांना विधिमंडळातील मोठा अनुभव आहे. त्यांना पुन्हा निवडून दिल्याने फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर ते घेतील; असा विश्वास आम्हाला असल्याचे मत सुद्धा नेवसे यांनी यावेळी व्यक्त केले.

गत १५ वर्षात फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी फक्त आमदार निधी सोबतच त्यांनी फलटण शहरासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर करून आणला आहे. आगामी काळामध्ये सुद्धा भरीव निधी फलटण शहरासाठी आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपले बहुमोल मत देवून दीपक चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन नेवसे यांनी यावेळी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!