दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2022 | फलटण | आगामी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतूद करण्यासाठी फलटण – पंढरपूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुनिश्चित करण्याशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी दि. 30 डिसेंबर 2022 रोजी पत्राद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वेक्षण व भू – संपादन होऊन प्रलंबीत राहिलेला फलटण – पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण करुन त्यावरुन प्रवासी व माल वाहतूक तातडीने सुरु करण्याची मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव व राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्याला यश आलेले आहे.