
स्थैर्य,कोल्हापूर,दि. २४ : जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण करून ई-पेमेंटद्वारे पुरस्काराची रक्कम खात्यात जमा केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित असणारे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे, गटविकास अधिकारी शरद मगर यांना तसेच तमनाकवाडाच्या सरपंच अलका साळवी, ग्रामसेवक वासंती मगर यांना पुरस्कार प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते.