स्थैर्य, सातारा, दि.२९: कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 13 रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून भविष्यात या सुविधेचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.