पुणे येथील ‘फिरते माती-पाणी प्रयोगशाळे’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण


स्थैर्य, पुणे, दि. ११: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज फिरते माती-पाणी प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण तसेच पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबराव वायकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!