जिल्हा नियोजनमधून घेतलेल्या महावितरणच्या वाहनांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि. १५: जिल्ह्यातील महावितरणची व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने महावितरणसाठी क्रेन असणाऱ्या दोन वाहनांची जिल्हा नियोजनमधून खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, विभागीय अभियंता श्री. लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येकी 35 लक्ष रुपयांच्या या वाहनामध्ये क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यास एक बकेट बसवण्याची व्यवस्था आहे. विद्युक खांबांवरील दिवे बसवणे, झाडे तोडणे यासह ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठीही या वाहनांचा उपयोग होणार आहे. यावेळी पालकमंत्री यांनी या वाहनांच्या कार्यपद्धतीविषयीची माहिती जाणून घेतली. तसेच यामुळे अत्यावश्यक वेळी महावितरणला ट्रान्सफॉर्मर बदलणे, दिवे बसवणे यासाठी जलद गतीने काम करता येणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!