पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लसीकरणाच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण, दुर्गम भागातील नागरिकांचे होणार लसीकरण


स्थैर्य, सातारा, दि.२१: जिव्हिका हेल्क केअरकडून लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील, वाड्यावस्त्यावर ही रुग्णवाहिका जाणार असून येथील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशा निर्देश देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!