दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । साहित्य संस्कृती, कला, इतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ 53 पुस्तकांचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारीक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधन या विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेल्या पुस्तकांचे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी लोकार्पण करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनासारख्या महासंकटातही ही परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 53 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या मंत्रालयीन दालनात दि. 23 फेब्रुवारी, 2022 रोजी झाले, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांनी कळविले आहे.