स्थैर्य, वाठार स्टेशन, दि.२९: उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशनमध्ये गेली कित्येक वर्ष रुग्णवाहिकेचा प्रश्न प्रलंबित होता याचमाध्यमातून विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी आंदोलनाचे व उपोषणाचे हत्यार उपसले होते परंतु शासनाने या अगोदरच वाठार स्टेशनला मोठी व सुसज्ज अशी रुग्णवाहिका दिल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसं पाहिलं तर वाठार स्टेशनच्या आजूबाजूला 60 ते 70 गावेअसल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेची कमी भेडसावत होती व रुग्णांचे अतोनात हाल होत होते ही मागणी समाजमाध्यमातून वेळोवेळी जोर धरत होती परंतु या मागणीला आज अखेर यश आले व विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला यावेळी सातारा जिल्ह्याचे कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे, राष्ट्रवादीचे युवा नेते नागेशशेठ जाधव, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, विद्यमान सरपंच संजय माने, उपसरपंच अनिल माने, माजी उपसरपंच संजय भोईटे, माजी सरपंच ऋषीभैय्या जाधव, शिवसेनेचे वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य नितीन चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमित चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य गायकवाड व सर्व आरोग्य सेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.