स्थैर्य, मुंबई, दि.२७: कालच्या व्यापारी सत्रात अमेरिकी क्रूडसाठ्यात घट दिसून आल्याने तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. यामुळे संभाव्य अतिरिक्त पुरवठ्याची चिंता कमी झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थितीसंबंधी अहवालाकरिता गुंतवणूकदार आता यूएस जीडीपी आणि बेरोजगारीच्या दाव्यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीची प्रतीक्षा करत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
कालच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर काही प्रमाणात ०.२१ टक्के वाढले व ते ६६.१ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तेल मागणीत सुधारणेचा आशावाद तसेच अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरणीमुळे किंमती वाढल्या. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (ईआयए) अहवालानुसार, अमेरिकी क्रूड साठ्यात १.७ दशलक्ष बॅरलची घट मागील आठवड्यात झाली त्यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळाला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील आण्विक करारातील घडामोडी बाजारासाठी केंद्रबिंदू आहे. कारण यामुळे इराणीयन ऊर्जा उद्योगावरील बंदी उठण्याची शख्यता आहे. हा करारा झाल्यास जागतिक तेल बाजारात १ ते २ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढा अतिरिक्त पुरवठा होईल. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आणि क्रूडमधील नफ्यावर मर्यादा आल्या. यासह तेलाचा मोठा उपभोक्ता असलेल्या भारतात कोव्हिड-19 संक्रमितांचा वाढता आकडा तसेच चीनकडूनही कमकुवत मागणीमुळे तेलाचे दर दबावाखाली राहिले.