व्यावसायिकांनो मालमत्ता करात २५% सवलत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण नगर परिषेदेचा निर्णय

दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आलेले होते. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा देण्याचे काम फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. व्यावसायिकांना मालमत्ता करामध्ये २५% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु याचा जर व्यावसायिकांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी येणार्या ३० नोव्हेंबरच्या आतमध्ये मालमत्ता कर भरणे गरजेचे आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना काळामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणार्या अस्थापना सोडून ईतर सर्व अस्थापना ह्या तीन महिन्यापेक्षा अधिक महिने बंद होत्या. अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व व्यावसायिकांना मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मालमत्ता कर भरणे गरजेचे आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!