हार, गुच्छ, केक ऐवजी वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२२ । गोखळी । नाहक खर्चाला फाटा देवून धुमाळवाडी, ता. फलटण येथे वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. केक कापून नाहक पैसा वाया घालविण्याऐवजी उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करुन वाढदिवस राजकारण विरहित साजरा करण्याचा निर्णय गावातील युवकांनी एकत्रित पणे घेतला आहे.

ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्यांनी एक झाड किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या ऐपतीप्रमाणे झाडे देऊन गावच्या सार्वजनिक ठिकाणी आणि परिसरात डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून पैसा वाया जाण्याऐवजी वृक्षारोपण केलेले वृक्ष भविष्यात उत्पादन देण्यास सुरुवात झाल्यापासून आर्थिक उत्पन्न सुरु होईल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल. गाव तेथे राजकीय गट असतात मात्र वाढदिवसा सारख्या कार्यक्रमांत राजकारण न आणता राजकारण विरहित हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमाची सुरुवात लक्ष्मी माता मंदिर धुमाळवाडी येथे वाढदिवसानिमित्त नारळाचे वृक्षारोपण करुन करण्यात आली. धुमाळवाडी गावची लोकसंख्या साधारण तीन साडेतीन हजारांच्या आसपास आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी धुमाळवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!