जलाने पूर्ण भरलेला घडा थोडाही आवाज करत नाही. अर्धा भरलेला घडा मात्र जास्त आवाज करतो.
त्याचप्रकारे विद्वान लोक आपल्या विद्वत्तेचा गर्व करत नाहीत. परंतु गुणहीन माणसे स्वतःला गुणी सिद्ध करण्यासाठी अखंड बडबड करीत असत.यावरुन आपण ठरवायचे मूल्य वाढवायचे की अवमूल्यन करायचे.
आपल्या खिश्यात १०रुपायांची १० नाणी असतील तर आवाज व ओझं होऊन किंमत १०० रुपये होणार…त्याच जागी शंभराच्या दहा नोटा असतील तर आवाज व ओझं न होता किंमत हजार होणार.आता तुम्हीच ठरवा चिल्लर होईच का नोट?
चिल्लरच नुसता खणखणाट अन् नोटाचा बिलकूल आवाज नाही पण रुबाब न्यारच.ज्याला सामाजिक काम अथवा मदत करायची तो गाजावाज न करता कार्यरत असतो.पण उगाच गाव जागा अन् कामाचा शिमगा अशी अवस्था नुसत्या आवाज करणाराची असते.आवाज करणाऱ्याच्या नादी कुणी लागावं म्हणून त्याच फावतं पण किंमत तेवढीच.या उलट शांत संयमी पण जिथल्या तिथं मिटवून पुढं वाटचाल करणाऱ्याची किंमत अनमोलच.आवाज चढवून बोलणं हे खरं नव्हे.तर नुसतं चिल्लर खुर्दा आहे.त्या परीस आरामात मोजकेच बोलून नोटा असणं महत्त्वाचे .
आपल्या भावी पिढीला सुद्धा चिल्लर न बनवता नोटच महत्त्व पटवून द्या .गडगडणारे ढग बरसत नसतात.नवनिर्मीत ही बीजा प्रमाणे बहरते.अन् वृक्ष कोसळताना कडाड आवाज करुन जमीनदोस्त होतो.सर्जनशीलता ही चाहूल न देता येते.आवाजाच कौतुक कामापुरतं तोंडदेखले पुरते.
ठरलं तर नोट सारखं आवाज न करता मूल्य वाढवून ज्याच्या त्याच्या संगतीत मूल्ये वाढवू या.
आपल्या संगतीत सोबत्याच मूल्यमापन योग्य व्हावे
आपलाच मूल्यशोधक – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१