‘लाडकी बहीण’चा डिसेंबरचा हप्ता पात्र महिलांना देण्यास प्रारंभ

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची यशस्वी सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | मुंबई |
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसर्‍या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

योजनेची वैशिष्ट्ये :

  • आर्थिक आधार : महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावणे.
  • सन्मानाचा भाव : योजना केवळ निधीपुरती मर्यादित नसून, महिलांच्या आत्मसन्मानाला चालना देणारी आहे.
  • सशक्तीकरण : महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न.

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेमुळे महिलांना सन्मान निधी मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

राज्य शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असून, या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याबरोबरच आत्मसन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळेल.


Back to top button
Don`t copy text!