स्थैर्य, फलटण : कोरोनामुळे १ ऑगस्ट पासून महाविद्यालयांचे नवीन वर्ष सुरू करण्याचे नियोजन असले तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) पुणे, मुंबई, सांगली येथील सर्व महाविद्यालये ऑनलाईन पद्धती सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. शरद कुंटे यांनी दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृमंदिर शाळेच्या नियोजित वास्तूचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार गिरीष बापट व डॉ. मंगलाताई नारळीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी डॉ. शरद कुंटे, महेश आठवले, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
‘कोरोना’ची स्थिती कधी सुधारेल हे माहिती नाही. त्यामुळे संस्थेने लाॅकडाऊन काळात प्री प्रायमरी पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. मात्र आता महाविद्यालयीन वर्ग नियमीत सुरू होणार आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली येथील कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, नर्सिंग, विधी यासह इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. सध्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्सचे लायसन्सही संस्थेने घेतले आहे, असे हि कुंटे यांनी सांगितले.