यशवंतराव रणवरे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । फलटण । श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे माजी चेअरमन तसेच राजे गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंतराव रणवरे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

कित्येक वर्षे त्यांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेची धुरा समर्थपणे सांभाळली होती. स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते.

मालोजीराजे बँकेसोबतच त्यांनी सातारा जिल्हा बँकेचे संचालकपदही अनेक वर्षे भुषवले होते.त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!