दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावामधील स्वातंत्र्य सैनिक कै. ज्ञानेश्वर जवळेकर यांच्या पत्नी श्रीमती सरलाताई ज्ञानेश्वर जवळेकर यांचे दि. ०२ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पच्छात मुलगा, मुली, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे.
सरलाताई एक सुशिल, सात्विक, सोज्वळ, सुसंस्कृत, आदर्श अशा प्रेमळ माता म्हणून कुमठे पंचक्रोशीत परिचित होत्या. अध्यात्माचा गाढा अभ्यास असणाऱ्या सरलाताई उत्कृष्ठ प्रवचनकार होत्या. दुसऱ्यांच्या सु:ख – दुःखात सहभागी होत सर्वांनाच धीर देत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा त्यांच्या स्वभावाचा एक विशेष पैलू होता. श्रीमती सरलाताई यांच्या निधनाने कुमठे पंचक्रोशीतील नागरिकांचे मातृ छत्र हरपले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.