दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । वडले गावचे सुपुत्र, वडले गावचे माजी सरपंच, श्री दत्त जयंती उत्सवाचे अग्रणी, जुन्या पिढीतील एक मार्गदर्शक, समाजशील, शांत, संयमी व अनुभवी व्यक्तिमत्त्व, सातारा जि.प.बांधकाम, उपविभाग फलटण’चे कर्मचारी तसेच फलटण तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती’चे सचिव शंकरराव सोनवलकर यांचे वडील सर्जेराव मोतीराम सोनवलकर पाटील (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ७७ वर्षे होते.