
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । कोरेगाव मार्गावरील शहरालगत कृष्णानगर येथील दोन नंबर गेट समोर अज्ञात वाहनाने धडक देवून माणीक लक्ष्मण चव्हाण वय ५५, रा. प्रतासिंहनगर, सातारा यांना गंभीर जखमी केले होते. ही घटना दि. १0 रोजी घडली. यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रवीण चव्हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दिली आहे.
