दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत गावच्या कमानीसमोर दि. २२ जून २०२३ रोजी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त पायी वारीत पंढरपूरकडे निघाले असताना ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले सुरेश पंढरीनाथ मोरे (वय ६६, रा. संतनगर अरण्येश्वर, आण्णाभाऊ साठे नगर झोपडपट्टी, पुणे) यांचे उपचार सुरू असताना निधन झाल्याने अज्ञात ट्रकचालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद गणेश आप्पा जतकर (रा. मराठा वस्ती, सोलापूर, ता. जि. सोलापूर) यांनी दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास स.पो.नि. रानगट करत आहेत.