चारचाकी वाहनाने धडक दिलेल्या जखमी पादचाऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । सातारा । मलकापूर (ता. कराड) येथे चारचाकीने पादचाऱ्यास धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाले होते, त्यास उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु सदरील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शंकर आनंदा कुंभार (वय- 71 वर्षे रा. कुंभारगाव ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निखिल बलराम पोपटानी (वय- 33 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत कराड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेंगलोर- पुणे जाणारे हायवेवर कराड बाजुकडे जाताना मलकापुर हद्दीत एन. पी. मोटर्स दुकानाचे समोर सांयकाळी 6.15 वाजणेचे सुमारास चारचाकीने पादचाऱ्यास धडक दिली. एक पांढऱ्या रंगाची कार पुणे बाजुकडे जात होती, त्या कारने पायी चालणाऱ्या शंकर कुंभार यांना धडक दिली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून निघून गेला होता. तेव्हा फिर्यादी निखिल पोपटानी यांनी कारचा पाठलाग केला. सदरची कार क्रमांक (MH-09-DA-4706) कोल्हापुर नाका येथे थांबवली. तेव्हा कार चालकाने अनिल नारायणदास नोतानी (रा. रुईकर काॅलनी, कोल्हापुर) असे नांव सांगितले.
अपघातातील जखमी शंकर कुंभार यांना उपचारासाठी काॅटेज हाॅस्पीटल कराड येथे नेण्यात आले होते. परंतु उपचारापुर्वीच ते मयत झाले होते. कार चालक अनिल नोतानी यांच्यावर भरधाव वेगाने निष्काळजी पणे कार चालवून, गंभीर दुखापत व मृत्यूस कारणीभूत प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!