अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू


स्थैर्य, सातारा, दि. १२: पुसेगाव ते फलटणकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.बळीराम शिवराम यादव (वय ३७, रा. खातगुण, ता. खटाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  बळीराम यादव आणि अन्य एकजण दि. ९ रोजी रात्री दहा वाजता दुचाकीवरून निघाले होते. यावेळी पुसेगाव ते फलटण जाणाऱ्या रस्त्यावरील न्यू साइश हॉटेल जवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्डयात दुचाकी आदळून दोघेही पडले. यात बळीराम यादव याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  पुसेगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्सटेबल शंकर सुतार यांनी फिर्याद दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!