
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जकातवाडी गावच्या हद्दीत फोन्टशीरसर, ता. माळशिरस येथील युवकाचा जकातवाडी गावच्या हद्दीत मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजित रामदास वाघमोडे, वय २७, मुळ रा. पाटील वस्ती, फोन्टशीरसर, ता. माळशिरस सध्या रा. जकातवाडी, ता. सातारा येथील कमांडो अकॅडमी (पोलीस प्रशिक्षण) या युवकाचा दि. १० नोव्हेंबर रोजी जकातवाडी गावच्या हद्दीत कुरणेश्वर मंदिरासमोर अचानक छातीत दुखून चक्कर आल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची खबर आनंद किसन जाधव, रा. जकातवाडी यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली.