
दैनिक स्थैर्य । 30 जुलै 2025 । सातारा । सज्जनगड पाहायला आलेल्या करमाळ्याच्या मुलीचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाला.श्रावणी राहुल लिमकर (16) असे या मुलीचे नाव असून घरच्यांनी विरोध करूनही ती या सज्जनगड सहलीसाठी घरातून शाळेच्या समूहासोबत गेली होती.
जन्मतःच तिच्या हृदयाला छिद्र. असे असतानाही ’ती’ वर्गातील मैत्रिणींसोबत सहलीला सज्जनगडावर आली. सज्जनगडाच्या वाहनतळापासून तिने गड चढला. पूर्ण गड चढून ती सज्जनगडावर पोहोचली. तिला इतका आनंद झाला की तिने तात्काळ तिच्या वडिलांना फोन केला, ’पप्पा, मी गड चढला.’ असं म्हणताच ती खाली कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रावणी राहुल लिंमकर (वय 16, रा. करमाळा रोड, करमाळा, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. श्रावणी ही दहावीत शिक्षण घेत होती. करमाळ्यात तिने एक खासगी क्लास लावला होता.
या क्लासमधील मुला-मुलींची सहल सज्जनगडावर आली होती. सहलीला येण्यापूर्वी तिच्या वडिलांनी तिला ’तू जाऊ नकोस’, असं सांगितलं होतं. कारण तिच्या हृदयात लहानपणापासून छिद्र होतं. यामुळे तिला डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचे सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते, असे असतानाही हट्ट करून ती सहलीला सज्जनगडावर आली.
सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक व विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तीने विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गडावर गेली. गडावर जाऊन तिने देवदर्शन घेतले तसेच आई-वडिलांनाही व्हिडिओ कॉल करून बातचीत केली. त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिचा गडावरच मृत्यू झाला. सातारा येथील गडाच्या पायर्या चढून गेल्यानंतर तिला कसलाही त्रास जाणवला नाही. मात्र तिचा सज्जनगडावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तिच्यावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत तिच्या चुलत्यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. हवालदार निकम तपास करत आहेत.