
मृत्यू झालेल्यांसह 160 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी
स्थैर्य, सातारा दि. 14 : सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सारीचे रुग्ण म्हणून दाखल असणाऱ्या वारुंजी ता. कराड येथील 50 वर्षीय पुरुषाचा आणि कण्हेर ता. सातारा येथील 61 वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला असून या दोघांचे घशातील नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
158 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीसाठी
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 19, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 42, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 12, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, ग्रामीण रग्णालय, कोरेगाव येथील 7, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 5, शिरवळ येथील 11, रागगांव येथील 2, पानमळेवाडी येथील 8, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 12, पाटण येथील 3 व दहिवडी येथील 7 अशा एकूण 158 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन.सी.सी. एस. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.