आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी प्रवेशिका ०८ जुलै २०२३ पर्यंत भरण्याची मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२३ । मुंबई । आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 च्या प्रसाराची व्याप्ती वाढवण्यातील प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.

माध्यम संस्था 8 जुलै 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान , 2023 साठी त्यांच्या प्रवेशिका आणि आशय सामग्री  [email protected] या  लिंक वर पाठवू शकतील.  मार्गदर्शक तत्त्वांनुसार मीडिया हाऊसेस 10 जून 2023 ते 25 जून 2023 या कालावधीत तयार केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या किंवा दृकश्राव्य/दृश्य सामग्रीचे प्रसारण/प्रसारण केलेल्या लेखाच्या संबंधित क्लिपिंगसह विहित नमुन्यात तपशील सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने द्वितीय वर्षाच्या  आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान पुरस्कारांबाबत घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान 2023 अंतर्गत, मुद्रित, दूरचित्रवाणी  आणि रेडिओ अशा तीन वर्गवारीत बावीस भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये तेहतीस पुरस्कार प्रदान केले  जातील. यामध्ये  वृत्तपत्रांमध्ये योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी”  22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. इलेक्ट्रॉनिक मीडिया (दूरचित्रवाणी ) मधून  योगाभ्यासाच्या सर्वोत्तम प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील. इलेक्ट्रॉनिक मीडिया (रेडिओ) द्वारे योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी  22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.

पुरस्काराचे स्वरुप

या पुरस्काराच्या सन्मानाची शिफारस स्वतंत्र ज्युरी व्दारा करण्यात येईल. सन्मानामध्ये एक विशेष माध्यम/प्लेक/ ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्राचा समावेश असेल.

आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्माना बद्दल

भारत आणि परदेशात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी ओळखून, माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाने जून, 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम  सन्मानची  (एआयडीएमएस )  स्थापना केली होती. पहिले पुरस्कार  7 जानेवारी 2020 रोजी प्रदान करण्यात आले  आणि त्यानंतर कोविड 19 महामारीमुळे विलंब झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे सन्मान पुनरुज्जीवित करण्याचा आणि 2023 मध्ये दुसरी आवृत्ती आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या https://pib.gov.in/indexd.aspx  तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळांवर या विषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!